प्रयागराज महाकुंभ 2025 – सिटी न्यूज स्पेशल रिपोर्ट

आस्था, श्रद्धा आणि सनातन धर्माचा हा महापर्व! 144 वर्षांनी आलेल्या या महाकुंभात करोडो भाविकांनी पवित्र गंगेत स्नान करून पुण्यसंचय केला आहे. अमरावती आणि मेलघाटसह संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भक्तगण या सोहळ्यात सहभागी झाले आहेत. देश-विदेशातून आलेल्या साधू-संतांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पाहुया आमच्या प्रतिनिधि राजेश मालवीय यांची प्रयाग राज येथून खास रिपोर्ट .
प्रयागराजचा हा महाकुंभ म्हणजे केवळ एक धार्मिक सोहळा नाही, तर भारतीय संस्कृतीच्या महान परंपरेचा उत्सव आहे. गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमावर लाखो भाविकांनी पवित्र स्नान केले.
भाविकांने आपले अनुभव आमच्या प्रतिनिधि समोर व्यक्त केले भाविकांनी सांगितले की
ही संधी जीवनात एकदाच मिळते, आम्ही येथे येऊन अत्यंत आनंदी आहोत,” असे एका अमरावतीतील भाविकाने सांगितले. साधू-संतांच्या आश्रमांमध्ये ज्ञान आणि भजन-कीर्तनाचा कार्यक्रम सुरू आहे.महाकुंभाच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था केली असून, प्रत्येक घाटावर सुरक्षारक्षक तैनात आहेत.
हे आहे श्रद्धेचे महासंगम, भारताच्या सांस्कृतिक समृद्धीचे प्रतिक! करोडो भाविकांच्या उपस्थितीने प्रयागराज महाकुंभाने इतिहास रचला आहे. आपण सिटी न्यूजसोबत राहा