राज्यस्तरीय सेमिनार मध्ये गो. से. महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.दिव्या मुऱ्हेकर यांना तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस.

खामगाव :- श्री.शिवाजी कॉमर्स, आर्ट & सायन्स कॉलेज अकोला येथे राज्यस्तरीय सेमिनार दिनांक 15/02/2025 रोजी मॅथेमॅटिकल सायंसेस या विषयावर आयोजित करण्यात आला होता. राज्यभरातून विविध महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विविध विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, फिजिक्स, कम्प्युटर सायन्स, मॅथेमॅटिकस, सांख्यिकी शास्त्र या विषयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. गो. से. महाविद्यालयातील शुभम पारखे, अभय नुपनारायण, विशाल पवार, कु. श्रुतिका चव्हाण, कु. दिव्या मुऱ्हेकर या पाच विद्यार्थ्यांनी या राज्यस्तरीय सेमिनार मध्ये सहभाग घेतला होता. त्यामध्ये कुमारी दिव्या मुऱ्हेकर बीएससी भाग २ हिने LiFi टेक्नॉलॉजी या विषयावर प्रकाश गतीने डाटा वायरलेस ट्रान्सफर कसा होतो याविषयीचा अभ्यास प्रस्तुत सेमिनारमध्ये विस्तृतपणे सेमिनार सादर केला. प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने उल्लेखनीय मांडणी करून आपल्या अभ्यासाची छाप या सेमिनारमध्ये पाडली.
तिला यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत इलेक्ट्रॉनिक्स या विषयात तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले यात तिला कॅश प्राईझ १५०१, मेमॉन्टो आणि सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला. त्याबद्दल संस्थेचे मा अध्यक्ष डॉ. सुभाषजी बोबडे, सचिव डॉ. प्रशांतजी बोबडे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर, यांनी तिने संपादन केलेल्या यशाबद्दल अभिनंदन व कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळाल्यास काही संशोधनात्मक गोष्टी पुढे येऊ शकतात. अनेक विद्यार्थी आपल्या विषयात अभ्यासपूर्ण रूची दाखवतात विज्ञान प्रदर्शनी, सेमिनार, नाविन्यपूर्ण उपक्रम यामध्ये सहभाग घेऊन महाविद्यालयाचा लौकिक वाढवतात याचा अभिमान संस्थेला आहे. विषय मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांच्या कल्पक बुद्धीला दिशा देण्याचे काम केल्यास असे यश संपादन करता येते. असा विश्वास माननीय प्राचार्यांनी तिचे कौतुक करताना व्यक्त केला. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे विभाग प्रमुख प्रा. के. के. पठाण, डॉ. जे. एस.तातेड, प्रा. आय. जे. कराळे, डॉ. वाय. एस. म्हैसागर, श्री अंकुश माळवंदे आदींनी तिचे भरभरून कौतुक केले आहे. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्धी प्रमुख प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख यांनी दिली आहे. माननीय संपादक / जिल्हा प्रतिनिधी वरील बातमी फोटोसह आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द़ करुन उपकृत करावे ही विनंती.