नागपुरात जबरी चोरी प्रकरणाचा गुन्हे शाखा युनिट 4 च्या पथकाने लावला छडा

नागपुर :- नागपुरात जबरी चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे! 21 फेब्रुवारीला सक्करदरा येथे राहणारे फिर्यादी फिरोजखान अजहर खान कळमना येथून दोन लाख तीस हजार रुपये घेऊन परतत असताना अज्ञात तीन चोरट्यांनी त्यांच्या बॅगवर डल्ला मारला! मात्र, शहर गुन्हे शाखा युनिट 4 च्या पथकाने अवघ्या काही तासांत आरोपींचा शोध लावून ही मोठी चोरी उघडकीस आणली आहे!
21 फेब्रुवारी रोजी सक्करदरा येथील फिर्यादी फिरोजखान अजहर खान एका व्यक्तीकडून 2 लाख 30 हजार रुपये घेऊन घरी जात असताना, तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगवर झडप घालून ती हिसकावून पसार झाले! हा प्रकार घडताच फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली.पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत या प्रकरणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान, फिर्यादीच्या अल्पवयीन मित्रावर संशय गेल्याने त्याची कसून चौकशी करण्यात आली.
सखोल चौकशीत त्याने इतर मित्रांसह मिळून ही चोरी केल्याची कबुली दिली! पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
नागपूर शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्ह्यांवर पोलिसांनी वचक ठेवला आहे! गुन्हे शाखा युनिट 4 च्या तडाखेबंद कारवाईमुळे मोठ्या चोरीचा छडा लागला आहे! नागरिकांनी सावध राहावे आणि कुठल्याही संशयास्पद घटनेची तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी!