भावाला मारहाणीचा बदला – युवकाला घरात घुसून बेदम मारहाण!

नागपूर :- नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीत भावाला मारहाणीचा बदला घेण्यासाठी एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपींसह इतरांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेचा संपूर्ण तपशील जाणून घेऊया आमच्या क्राइम रिपोर्टमध्ये.
नागपूरच्या गिट्टीखदान परिसरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला! भावाला मारहाण झाल्याचा राग मनात धरत आरोपींनी युवकावर बेदम हल्ला केला. या घटनेत अल्पवयीन आरोपींचाही समावेश असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांच्या माहितीनुसार, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
नागपूर शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली असली तरी अशा घटना रोखण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज आहे. पुढील अपडेटसाठी पाहत राहा city news.