हिंगणा रोडवर बेफाम कार स्टंट; पोलिसांनी लावला 23,000+ चा दंड, पालकांसमोर माफी आणि ट्रॅफिक पार्कमध्ये प्रशिक्षण

नागपूर :- नागपूरच्या हिंगणा रोडवर नुकताच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही तरुणांनी रस्त्यावर कारच्या मदतीने स्टंटबाजी करत वाहतूक नियमांची पायमल्ली केली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. काय आहे हा संपूर्ण प्रकार?
हिंगणा रोडवर रात्रीच्या वेळी तरुणाईचा वेगावर ताबा सुटला आणि नियम धाब्यावर बसवत त्यांनी रस्त्यावर धोकादायक स्टंट केले. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागपूर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. प्रत्येकी 23,000 रुपयांचा दंड लावण्यात आला आणि पालकांसमोर मुलांना लेखी माफी द्यावी लागली. एवढ्यावरच न थांबता, या सर्व तरुणांना ट्रॅफिक पार्कमध्ये दोन तासांचे विशेष प्रशिक्षणही देण्यात आले. हा प्रकार इतरांसाठी धडा ठरेल का, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो!
वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर नागपूर पोलिसांनी चोख कारवाई केल्याने अशा घटनांना आळा बसणार का? याचा विचार प्रत्येक वाहनधारकाने करणे गरजेचे आहे. रस्ते आपले आहेत, पण ते सुरक्षित ठेवण्याची जबाबदारीही आपलीच आहे. ‘सिटी न्यूज’ वर आज इतकंच, पुढच्या अपडेटसाठी जोडलेले राहा