“निर्मिती पब्लिक स्कूलतर्फे गाडगेबाबांच्या विचारांना जीवंत करत चांदुर बाजारमध्ये भव्य स्वच्छता अभियान!”

चांदुर बाजार :- नमस्कार, आपण पाहत आहात विशेष बातमी – पूर्ण विश्वाला स्वच्छतेचा महामंत्र देणारे कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या विचारांना साकार रूप देत निर्मिती पब्लिक स्कूल, चांदुर बाजारतर्फे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गाडगेबाबा यांच्या वेशभूषेत साकारत स्वच्छतेचा संदेश दिला. गाडगेबाबांच्या विचारांचा प्रसार करत निर्मिती पब्लिक स्कूलने चांदुर बाजारमध्ये भव्य स्वच्छता अभियान राबवले !
गाडगे महाराजांनी स्वच्छतेला सर्वोच्च स्थान दिले होते आणि त्याच प्रेरणेने निर्मिती पब्लिक स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हा अनोखा उपक्रम हाती घेतला. यावेळी गावातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देत, व्यसनमुक्तीचा महत्त्वपूर्ण संदेशही देण्यात आला. संपूर्ण गावात स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून एक सकारात्मक लाट पसरली. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक यांनी स्वच्छतेचे महत्त्व विशद करत मान्यवरांचे आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानले.
या वेळी भास्करराव टोम्पे, विजयराव टोम्पे, राजेंद्र रामटेके, वैष्णवी टोम्पे, जेष्ठ पत्रकार सुरेशराव सवळे, मुख्याध्यापक तुषार खोंड, पत्रकार सागर सवळे आणि क्रीडा मार्गदर्शक सुयोग गोरले आदी मान्यवर उपस्थित होते
स्वच्छता हीच सेवा! गाडगेबाबांच्या विचारांना उजाळा देत, चांदुर बाजारमध्ये अनोखी स्वच्छता चळवळ उभी राहिली. यामुळे संपूर्ण समाजाला एक नवा प्रेरणादायी संदेश मिळाला. अशीच स्वच्छता व सामाजिक जागृतीची मोहिम सातत्याने राबविली जावी.