छत्री तलाव परिसरात संत निरंकारी मिशनच्या ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत स्वच्छता मोहीम

आजच्या आपल्या विशेष बातमीमध्ये पाहणार आहोत संत निरंकारी मिशनच्या ‘प्रोजेक्ट अमृत’चा तिसरा टप्पा आणि छत्री तलाव परिसरात राबविण्यात आलेल्या भव्य स्वच्छता मोहिमेची सविस्तर माहिती.
छत्री तलाव परिसरात संत निरंकारी मिशनच्या ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या संकल्पनेतून जलसंवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. शेकडो स्वयंसेवकांनी या मोहिमेत सहभाग घेतला आणि परिसर स्वच्छ केला. या अभियानाअंतर्गत देशभरात 1600 हून अधिक ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या. पर्यावरण रक्षणाचा संदेश देत निरंकारी मिशनच्या या उपक्रमाचे नागरिकांनी भरभरून स्वागत केले.
स्वच्छता हीच सेवा आणि जलसंवर्धन हा काळाची गरज आहे. संत निरंकारी मिशनच्या या स्तुत्य उपक्रमातून समाजाला मोठा संदेश मिळतो. आपणही आपले परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करूया. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा City News.