जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांचा अवमान महागात, अनुयायी आक्रमक, वडेट्टीवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून विविध स्तरातून त्यांच्यावर टीका केली जातंय. राज्यात अनेक ठिकणी त्यांचे शिष्य आणि अनुयायी आंदोलन करताना दिसत आहेत. वडेट्टीवार यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात येतंय. आता विजय वडेट्टीवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नरेंद्र महाराज स्वतः मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आज करणार तक्रार दाखल करणार आहेत. उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर त्यांच्या अनुयायांनी मोठ्या संख्येने जमण्यास सुरूवात केलीये.
मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील नरेंद्र महाराजांसोबत तक्रार दाखल करण्यासाठी हजर राहणार आहेत. आज नरेंद्र महाराजांच्या अनुयायांकडून वडेट्टीवारांविरोधात राज्यभर तीव्र निदर्शने केली जात आहेत. त्यांचे अनुयायी हे रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळतंय. दुपारी बारा वाजता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन नरेंद्राचार्य महाराज हे तक्रार दाखल करणार आहेत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अनुयायी निदर्शने करत आहेत.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अनुयायी जमले असून त्यांच्या हातात काही फलके बघायला मिळत आहेत. विजय वडेट्टीवार यांच्या फोटोसह निषेध देखील लिहिण्यात आलंय. काही फलकांवर माफी मागा…माफी मागा असे लिहिले आहेत. विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात जगद्गुरु नरेंद्राचार्य यांचे अनुयायी चांगलेच आक्रमक होताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी आज आंदोलने करून विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात तक्रारी दिल्या जात आहेत.
एकीकडे विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज आणि त्यांच्या अनुयायांनी आक्रमक पवित्रा घेतला असला तरीही यावर विजय वडेट्टीवार यांनी यावर काहीच स्पष्टीकरण दिलेले नाहीये. मतांचे धार्मिक ध्रुवीकरण करणारे असे महाराज होऊ शकत नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले होते. त्यानंतर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या अनुयायांसाठी संताप व्यक्त केला जातोय. आता यासर्व प्रकरणावर विजय वडेट्टीवार नेमके काय बोलतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.