Latest NewsMaharashtra Politics
विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात अमरावतीत तीव्र आंदोलन

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अमरावतीत आज इरविन चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. पाहूया हा संपूर्ण अहवाल..."
"आज अमरावतीच्या इरविन चौकात स्व स्वरूप संप्रदायाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या अपमानास्पद वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या शिष्य व अनुयायांनी जोरदार घोषणाबाजी करत तातडीने माफी मागण्याची मागणी केली. विनायक सवाई यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात २५० हून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. तसेच, संतांच्या बाबतीत अपमानास्पद वक्तव्य केल्यास भक्तांच्या भावना दुखावल्या जातील, असा इशाराही आंदोलकांनी दिला."
"तर विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर अजूनही कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या अनुयायांनी संतांच्या अपमानास कधीही सहन केले जाणार नाही, असा ठाम इशारा दिला आहे.