राज्यपाल श्री सी.पी. राधाकृष्णन यांचे हस्तेविद्यापीठातील वसतिगृहाचे व रासायनिक तंत्रशास्त्र विभाग विस्तारित इमारतीचे लोकार्पण

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री सी.पी. राधाकृष्णन यांचे हस्ते नुकतेच विद्यापीठ परिसरामध्ये नव्याने निर्माण केलेल्या आदिवासी मुलांचे वसतिगृह इमारत व रासायनिक तंत्रशास्त्र विभाग विस्तारित इमारतीचे ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री भूषण गवई, कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रवीण रघुवंशी, डॉ.आर.डी. सिकची, डॉ.व्ही.एम.मेटकर, डॉ. विद्या शर्मा, डॉ. एन.व्ही. चांगोले, डॉ. व्ही.एच. नागरे, डॉ. ए.एम. बोर्डे, डॉ. मनिषा कोडापे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, वित्त व लेखा अधिकारी सी.ए. पुष्कर देशपांडे, अधिष्ठाता डॉ.डी.डब्ल्यू. निचित, डॉ.एच.आर. देशमुख, डॉ. मोना चिमोटे, डॉ. वैशाली गुडधे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, तंत्रशिक्षण सहसंचालक श्री मनोज अंधारे आदी उपस्थित होते.
विद्यापीठ परिसरामध्ये आदिवासी विकास केंद्र वसतिगृह इमारतीचे बांधकाम करण्यात आले असून चोवीस विद्यार्थी या वसतिगृहामध्ये राहू शकतील इतक्या क्षमतेचे आहे. याशिवाय दिव्यांग विद्याथ्र्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था तसेच स्वयंपाकघर व जेवण्याची व्यवस्था, स्टोअर आदी व्यवस्था वसतिगृहामध्ये उपलब्ध करुन दिली आहे. 4.46 कोटी रूपये वसतिगृह बांधकामावर खर्च झाले आहेत. त्यामध्ये रुसा कडून 2.5 कोटी, तर विद्यापीठाकडून जवळपास 2 कोटी रुपयांचा निधी यासाठी खर्ची घालण्यात आला आहे. या वसतिगृहाच्या निमित्ताने आदिवासी विद्याथ्र्यांच्या विकासाकरीता संधी व व्यवस्था उपलब्ध झालेली आहे.
विद्यापीठ परिसरामधील रासायनिक तंत्रशास्त्र विभाग इमारतीचे सुद्धा यावेळी विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री सी.पी. राधाकृष्णन यांचे हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. रुसा कडून प्राप्त 2.50 कोटी, तर विद्यापीठाकडून जवळपास 1 कोटी रुपयांचा निधी यासाठी खर्ची पडला आहे. यामध्ये वर्कशॉप, सेमिनार हॉल, क्लासरुम, स्टाफरुम व शंभर लोक बसतील असे ओपन ऑडिटोरियम आदी सुविधा उपलब्ध असतील. विद्यापीठ परिसरातील भौतिक विकासात यानिमित्ताने भर पडली आहे. विद्याथ्र्यांना जास्तीतजास्त सुविधा देण्याचा प्रयत्न विद्यापीठाचा आहे. आणखी विकास कामे परिसरात सुरु आहेत. विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता श्री शशीकांत रोडे व त्यांच्या विभागातील अभियंते व कर्मचायांचे परिश्रम यासाठी सार्थक लागले.