LIVE STREAM

AmravatiLatest News

स्व. श्री. जनार्दन नरहर दातार यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये नेत्रदान

स्टेट बँक कॉलनी, राजापेठ, अमरावती, येशील रहिवासी स्व. श्री. जनार्दन नरहर दातार यांचे दुःखद निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. दातार परिवारावर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळले परंतु अशाही परिस्थिती गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने दातार परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्री. जनार्दन नरहर दातार यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यानी अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री. स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे मेडिकल डिरेक्त्तर डॉ. मनिष बबन तोटे, श्री. हिमांशू प्रमोद बंड, श्री. अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मारनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे दातार कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. दातार परीवाला नेत्रदान केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात दातार परिवारातिल श्रीमती कविता कालोटी, श्री. हेरंब दीक्षित, श्री. शाम कुऱ्हेकर व दातार परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडलाने व कार्यकर्त्यांतर्फे स्व. श्री. जनार्दन नरहर दातार यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली.

भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असे आजार असलेल्या व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते तसेच चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केले जाऊ शकते. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्या आणि पंखा बंद ठेवावा तसेच ए.सी. असेल तर सुरु ठेऊ शकता. व मृत्यूच्या करणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र डॉक्टरान कडून घेऊन घ्यावे.

मरनोतर नेत्रदानासाठी संपर्क करा दिशा इंटरनॅशनल आय बँक,यशोदा नगर अमरावती. मो. 9899898667, 8275539754, 7378656145 किवा स्वप्नील अरुण गावंडे – 9423424450. ऑनलाईन नेत्रदानाचा संकल्प करण्यासाठी भेट द्या www.deeshagroup.org.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!