विदर्भ काशी शुक्लेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भक्तांचा जनसागर!

वाठोडा :- विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, वाठोडा येथील शुक्लेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त हजारो भक्तांनी हजेरी लावली आहे. विदर्भ काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात आजच्या दिवशी मोठा धार्मिक उत्सव साजरा होत आहे. साडेअकरा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.
भातकुली तालुक्यातील शुक्लेश्वर मंदिर, हे विदर्भातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र. महाशिवरात्री निमित्त मंदिरात आज भाविकांचा प्रचंड जनसागर लोटला आहे. पूर्णा नदीच्या तीरावर वसलेल्या या प्राचीन मंदिरात महादेवाच्या साडेअकरा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरहून भक्तगण दाखल झाले आहेत. मंदिर परिसरात दिवसभर धार्मिक कार्यक्रम, भजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच, शुक्लेश्वर देवस्थानच्या वतीने भक्तांसाठी मोफत फराळ वाटप करण्यात आले आहे. भक्तांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर शिवमय झाला आहे!
महाशिवरात्री निमित्त भक्तीचा महासागर उसळलेल्या शुक्लेश्वर मंदिरात अजूनही भक्तांची रीघ लागलेली आहे. या पवित्र स्थळी आलेले भाविक महादेवाच्या कृपेस पात्र होत आहेत, अशी श्रद्धा व्यक्त केली जात आहे. अशाच प्रकारच्या धार्मिक आणि सांस्कृतिक घडामोडींसाठी सीटी न्यूज सोबत राहा