नागपुरात घरफोडीचा गुन्हा उघड – दोन चोर आणि एक सोनार गजाआड

नागपूर :- नागपूरच्या पार्टी पोलीस स्टेशन हद्दीत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. पोलीस तपासात दोन चोर आणि त्यांना मदत करणारा एक सोनार पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला असून, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
फेब्रुवारी महिन्यात नागपूरच्या पार्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचा गुन्हा घडला होता. या प्रकरणी तपास करताना, पोलिसांना संशय होता की गुन्ह्यातील आरोपी परिसरातीलच असावेत.
पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दोन संशयित आरोपी दिनेश गोपाल यादव आणि कपिल शाहू यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली.
तपासादरम्यान, चोरी केलेले सोन्याचे दागिने त्यांनी एका सोनाराला विकल्याचे समोर आले. पोलिसांनी तातडीने त्या सोनारालाही ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलिसांनी एकूण १ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपींना अटक करून पुढील तपासासाठी पार्टी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाची अधिकृत माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली आहे.
नागपूर पोलिसांनी वेगवान तपास करत अवघ्या काही दिवसांत घरफोडी प्रकरणाचा छडा लावला आहे. आरोपींना न्यायालयात हजर करून पुढील चौकशी करण्यात येईल. नागपुरात होणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरूच आहेत. अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा City News!