LIVE STREAM

Crime NewsLatest NewsMaharashtra

अखेर दत्ता गाडेच्या नांग्या ठेचल्या, मध्यरात्री दीड वाजता उसाच्या चारीत अटकेचा थरार

पुणे :- स्वारगेट बस स्थानकातील तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्ता गाडे याचा शोध घेण्यास पुणे पोलिसांना अखेर यश आले आहे. गाडे याला त्याच्याच गावात असलेल्या एका शेतातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मध्यरात्री दीडच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तरुणीवर बलात्कार केल्यानंतर गाडे हा आपल्या गुणाट या गावी आला होता. माहाशिवरात्री असल्याने तो तिथल्या कीर्तन कार्यक्रमात देखील सहभागी झाला होता. मात्र माध्यमांवर त्याचा फोटो आल्यानंतर तो तिथून फरार झाला होता. गावकऱ्यांनी त्याला गावात आल्याचे पाहिले होते. त्यानुसार पोलिसांच्या 13 पथक त्याचा शोध घेण्यासाठी तैनात करण्यात आली होती. श्वान पथक, ड्रोनच्या माध्यमातून त्याचा शोध सुरु होता. गावात आणि आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध सुरु होता. पोलिसांनी दिवसभर शोधा ध करून देखील तो सापडला नव्हता. मात्र मध्यरात्री दीडच्या सुमारास तो पोलिसांना सापडला.

बलात्कारच्या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यकक्षामतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, दोन दिवसांच्या शोध मोहिमेला अखेर यश आले आहे. त्याला पकडल्यानंतर स्वारगेट पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याला पुण्यात आणण्यात आले आहे. शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास तो स्वारगेट पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांच्या हाताला लागला. त्याला घेऊन पोलिसांचे पथक आता पुण्याच्या दिशेने निघाले आहे. दत्ता गाडे याने अजून काही कांड केले आहेत का? याचा उलगडा देखील आता होणार आहे.

आरोपीला दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर करणार

स्वारगेट सारख्या माहत्वाच्या ठिकाणी ही घटना घडल्याने सर्वांनाचं धक्का बसला होता. यामुळे महिलांची सुरक्षितता पुन्हा एकदा वाऱ्यावर असल्याचे पहायला मिळाले आहे. तरुणीने योग्य वेळी तक्रार दाखल केल्याने या प्रकरणाला वाचा फुटली होती. त्यामुळे दत्ता गाडे सारख्या सराईत आरोपीला पकडणे शक्य झाले. आरोपीला आज दुपारी तीननंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपीला सध्या लष्कर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

कित्येक तास अटकेचा थरार

एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असा आरोपी दत्ता गाडे याचा अटकेचा थरार बघायला मिळाला. आरोपीने मंगळवारी पहाटे स्वारगेट बस स्थानकावर एका 26 वर्षीय तरुणीला गोड बोलून एका बसमध्ये नेलं होतं. त्यानंतर त्याने त्या तरुणीवर अत्याचार केला होता. यानंतर आरोपी फरार झाला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यासह संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली होती. पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. त्यामुळे पोलिसांवर मोठा दबाव वाढला होता.

पुणे पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी जंगजंग पछाडलं होतं. पोलिसांना सुरुवातीला सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपीची ओळख पटली होती. त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यात येत होता. आरोपी हा त्याच्या शिरुर येथील गुणाट गावीच गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी देखील गुणाट गावात ठाण मांडलं. पुणे गुन्हे शाखेचे आठ पथक काल सकाळी गुणाट गावी दाखल झाले. त्यांच्याकडून युद्ध पातळीवर तपास सुरु होता. या दरम्यान आरोपी हा गुणाट गावच्या उसाच्या शिवारात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. विशेष म्हणजे शेतामध्ये असणाऱ्या एका घरी तो पाणी प्यायला गेला होता, अशी देखील माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे आरोपी इथेच लपून बसल्याची खात्री पोलिसांना झाली.

पोलिसांची अतिरिक्त कुमक या ठिकाणी दाखल झाली. पुणे पोलिसांची काल दुपारपर्यंत 100 ते 150 जणांची फौज गुणाट गावात दाखल झाली. पोलिसांकडून उसाच्या शेतात शिरुन त्याचा शोध घेतला जात होता. आरोपीच्या शोधासाठी अत्याधुनिक ड्रोनची मदत घेण्यात आली. तसेच डॉग स्क्वॉडच्या मदतीने आरोपीचा शोध सुरु होता. तसेच स्थानिक नागरिकांकडूनही पोलिसांना मदत केली जात होती. असं असलं तरीही पोलिसांना आरोपीच्या शोधात काही अडचणी येत होत्या. उसाचे शेत अतिशय दाट असल्याने आरोपीचा शोध घेणं कठीण झालं होतं. याशिवाय संबंधित परिसरात बिबट्याचा वावर असतो. त्यामुळे पोलिसांपुढे दुहेरी आव्हान उभं ठाकलं होतं.

विशेष म्हणजे काल संध्याकाळी सात वाजले तरी आरोपीचा शोध लागला नाही. परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे पोलिसांना नाईलाजास्तव अंधार पडलं म्हणून शोध मोहीम थांबवावी लागली. पण ड्रोनच्या सहाय्याने पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात होती. या दरम्यान रात्री दीड वाजेच्या सुमारास उसाच्या चारीत पोलिसांना काही संशयास्पद हालचाली दिसल्या. पोलिसांनी तिथे जावून पाहिलं आणि एकाला ताब्यात घेतलं. यावेळी तिथल्या स्थानिकांनी हाच दत्ता गाडे असल्याचं सांगितलं. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आणि गाडीत बसवून पुण्याच्या दिशेला आणलं.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!