LIVE STREAM

AmravatiLatest News

मालमत्ता कर सह स्वच्छता विषयावर काँग्रेसचे मनपात जोरदार आंदोलन!

अमरावती :- आज अमरावतीत काँग्रेसतर्फे मालमत्ता कर आणि स्वच्छता विषयावर मनपाच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. काय आहे आंदोलनाचे नेमके कारण? आणि प्रशासनाची काय भूमिका आहे?

अमरावती महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर काँग्रेसतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या कीर्तनाच्या स्वरात आंदोलनाला धार आली. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा दिल्या.

माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी स्पष्ट शब्दांत प्रशासनाला जाब विचारला – ‘जर मालमत्ता कर व्याज रद्द केले, तर आधी पैसे भरलेल्यांना व्याजासह परत मिळाले पाहिजे!

तसेच, शहरातील स्वच्छतेच्या दृष्टीने प्रत्येक प्रभागात 55 सफाई कर्मचारी त्वरित लागू करावेत, अन्यथा आम्ही स्वतः प्रभागात जाऊन तपास करू, असा इशारा काँग्रेसने दिला.

मनपा प्रशासनाने निर्णय घेण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी मागितला आहे. त्यामुळे आंदोलन काही काळासाठी मागे घेण्यात आले. पण आता प्रश्न असा आहे की, व्याज भरलेल्या नागरिकांना पैसे परत मिळणार का? संपूर्ण शहराचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे!

तर पाहुया, मनपा प्रशासन या प्रकरणावर काय निर्णय घेते? काँग्रेसच्या मागण्या मान्य होणार का? आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळणार का? City News या घटनेवर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. पुढील अपडेटसाठी पाहत राहा City News .

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!