महाराष्ट्रात पुन्हा एक शोकांतिका: 32 वर्षीय नराधमाचा 8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

परभणी :- पुण्यातील स्वारगेट परिसरात घडलेली घटना ताजी असतानाच आता परभणीमध्ये अशीच एक संतापजनक घटना घडल्याचं समोर आलं आहे. बत्तीस वर्षीय नराधमाने आठ वर्षाच्या चिमुरड्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. लातूर जिल्ह्यातील धक्कादायक ही घटना आहे. सध्या महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना थांबताना दिसत नाहीत. परभणीत दहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला, त्यानंतर स्वारगेट येथे बसमध्ये 26 वर्षीय तरूणीवर बलात्कार झाला, आरोपीचा शोध लागत नाही तोवर त्यानंतर आज लातूर जिल्ह्यातील आठ वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे.
लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हलगरा या गावात धक्कादायक घटना घडली आहे. एका 32 वर्षीय व्यक्तीने आठ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी औराद शहाजानी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली आहे. कलम 64 (1) 65 दोन बी एम एस 2023 सह कलम 4, 8, 12 पोक्सो प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी सध्या फरार आहे. आरोपीच्या तपासासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत.
अल्पवयीन मुलीला दुकानात पाठवण्यासाठी बोलून घेऊन आरोपीने कुकर्म केले आहे. अल्पवयीन मुलीने घरातील लोकांना घटनेबाबत माहिती दिल्यानंतर नराधमाचा शोध सुरू झाला होता. त्यापूर्वीच आरोपी पळून जाण्याची यशस्वी झाला होता. औराद शहाजाणी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.