स्वारगेट प्रकरणावर प्रकाश आंबेडकर आक्रमक, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

पुणे :- महाराष्ट्राचे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना योगेश कदम यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. तसेच राज्य सरकारवर ‘राजकीय लकवा’ आल्याचा आरोप केला आहे.
पुणे पोलिसांच्या कार्यशैलीवरही आंबेडकर यांनी सवाल उपस्थित केले आहेत. स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या अटकप्रक्रियेत झालेल्या विलंबाबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिस प्रशासन जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला.
अकोल्यात माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या घटनेबाबत योगेश कदम यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. असे वक्तव्य केवळ बेजबाबदार नाही तर सरकारची असंवेदनशीलता स्पष्ट करणारे असल्याचे ते म्हणाले.
तर हे होते आजचे सर्वात मोठे राजकीय वादळ! प्रकाश आंबेडकर यांच्या या भूमिकेनंतर महाराष्ट्र सरकार आणि पोलिस प्रशासन यावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या प्रकरणावर तुमची काय मते आहेत? आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि राहा City News सोबत!