दुकानातून लांबवीले दोन लाखांचे मोबाईल; नंदुरबार तील शहादा शहरातील मध्यरात्रीची घटना

नंदुरबार :- नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. यातच शहादा नगरपालिका समोर असलेल्या मोबाईल दुकानातून मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी डल्ला मारला असून तब्बल २ लाख ५ हजार रुपयांचे मोबाईल लांबास केले आहेत. चोरी करताना ची संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
नंदुरबार शहरासह परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. रात्रीच्यावेळी सुमसाम परिसर पाहून चोरटे हात साफ करत आहेत. असाच प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात घडला आहे. यात नेहमी वर्दळ असलेल्या या परिसरातील मोबाईल दुकानांमध्ये मध्यरात्री प्रवेश करून मोबाईल लांबवीले आहेत. सकाळी दुकान उघडण्यासाठी गेलेल्या दुकान मालकाच्या हा प्रकार लक्षात आला.
पोलिसात गुन्हा दाखल
या घटनेत चोरटयांनी दुकानातून तब्बल २ लाख ५ हजार रुपयांचे मोबाईल लांबवीले आहेत. दरम्यान मोबाईल दुकानदाराच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा शहरात होणाऱ्या वारंवार चोरीच्या घटनेमुळे पोलीस प्रशासनाचा कार्यप्रणालीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.