गुन्हे शाखेची कारवाई – वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस

नागपुर :- नागपुरातील वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने मोठी कारवाई केली आहे. कळमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहन चोरी प्रकरणाचा छडा लावत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. जरीपटका परिसरात संशयास्पद हालचाली करत असताना पोलिसांनी त्यांना पकडले. या प्रकरणात चोरीस गेलेल्या दुचाकींसह एकूण ₹90,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस ठाणे कळमेश्वर येथे 109/2025 नुसार वाहन चोरीचा गुन्हा दाखल होता. संशयित आरोपी आदित्य महेंद्र शर्मा (वय 18, रा. कळमेश्वर) आणि सचिन दिवाकर फालके (वय 24, रा. आष्टी) यांना जरीपटका परिसरातून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून हिरो होंडा स्प्लेंडर (MH 40 U 3752) आणि होंडा सीबी शाईन (MH 40 CP 4012) या चोरीच्या गाड्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पेट्रोलिंग दरम्यान करण्यात आली असून, दोन्ही आरोपी पोलीस ठाणे कळमेश्वरच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
नागपुरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिसांनी सतर्क राहून मोठी कारवाई केली आहे. जप्त वाहनांचा तपास सुरू असून, या प्रकरणातील अन्य गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे. नागपूर गुन्हे शाखेच्या वेळीच केलेल्या या कारवाईमुळे वाहन चोरीच्या घटनांवर काही प्रमाणात आळा बसेल, अशी अपेक्षा आहे. पुढील अपडेटसाठी बघत राहा city news