रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई!

अकोला :- अकोला येथील रेल्वे मालधक्का परिसरातून तब्बल 8 लाख रुपये किमतीचा ट्रक चोरीला गेल्याची घटना घडली होती. मात्र, रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या तडफदार पथकाने अवघ्या काही दिवसांत या गुन्ह्याचा छडा लावून ट्रक हस्तगत केला आहे. आरोपींना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.
चला, पाहूया सविस्तर रिपोर्ट.
अकोला येथील रेल्वे मालधक्का परिसरातून MH-30-AV-0646 क्रमांकाचा ट्रक चोरीला गेल्याची तक्रार रामदासपेठ पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. यानंतर, पोलिस ठाण्याचे थानेदार मनोज बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रदीप जोगदंड, शेख हसन आणि त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करून आरोपीचा शोध घेतला. उत्तर प्रदेशमध्ये ही मोठी कारवाई करत चोरीचा ट्रक हस्तगत करण्यात आला.
या यशस्वी कारवाईमुळे जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे आणि एसडीपीओ सतीश कुलकर्णी यांनी संपूर्ण पोलिस पथकाचे अभिनंदन केले आहे. अकोला जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांचा हा मोठा यशस्वी प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
तर अकोला पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे वाहन चोरी करणाऱ्या टोळक्यांना मोठा धक्का बसला आहे. भविष्यातही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया केल्या जातील, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. पुढील अपडेटसाठी पाहत राहा आमचे विशेष वृत्त.