आधी लाथाबुक्क्यांनी मारहाण मग चाकूचा धाक दाखवत बलात्कार; अंगावरील सोनंही चोरलं ,पुणे पुन्हा हादरलं!

पुणे :- पुणे स्वारगेट बस डेपोत झालेल्या २६ वर्षीय तरूणीवर अत्याचार प्रकरण ताजे असतानाच आणखी एका घटनेमुळे पुणे हादरलं आहे. पुण्यातील शिरूर तालुक्यातील कोरेगावमधील एका तरूणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. नंतर तिच्या अंगावरील सोनं देखील लुटलं. या प्रकरणी २ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
पुण्यातील शिरूर तालुक्यातील कोरेगावात एक संतापजनक घटना घडली आहे. एका तरूणीला आधी चाकुचा धाक दाखवत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर दोन आरोपींनी तरूणीवर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर आरोपींनी तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरले. या धक्कादायक घटनेमुळे पुणे पुन्हा हादरलंय.
नेमकं काय घडलं?
शिरूर तालुक्यातील कोरेगावात एक युवती आपल्या मामे भावासह गप्पा मारत बसली होती. गप्पा मारत असताना त्या ठिकाणी दोन जण आले. दोन्ही आरोपी दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली आहे. दारूच्या नशेत त्यांनी आधी तरूणीला चाकुचा धाक दाखवला. नंतर दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर दोघांनी तरूणीवर लैंगिक अत्याचार केला. बलात्कार केल्यानंतर नराधमांनी तरूणीच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली असून, दोन्ही आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.