अकोल्यात घरफोडी करणाऱ्या विधीसंघर्ष बालकाला अटक – ₹49,652 किमतीचा मुद्देमाल जप्त!

अकोला :- अकोल्याच्या डाबकी रोड परिसरात झालेल्या एका घरफोडी प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. पोलीस तपासानंतर हा गुन्हा एका अल्पवयीन विधीसंघर्ष बालकाने केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तब्बल ₹49,652 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हा संपूर्ण प्रकार नेमका काय आहे?
पाहुया आमचा सविस्तर रिपोर्ट !
७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९:१५ ते संध्याकाळी ७:०० दरम्यान फिर्यादी कु. आभा जोशी या कामावर गेल्या होत्या. या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून चांदीचे दागिने, मोबाइल व रोख रक्कम असा एकूण ₹69,202 किमतीचा ऐवज लंपास केला.या प्रकरणी फिर्यादीने ८ फेब्रुवारी रोजी डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तपास अधिकाऱ्यांनी गुन्हे शोध पथकाच्या मदतीने तपासचक्र फिरवत आरोपीचा शोध घेतला.
पोलीस निरीक्षक धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
अल्पवयीन विधीसंघर्ष बालकाने गुन्ह्याची कबुली दिली व त्याच्याकडून ₹49,652 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कार्यवाही पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाईत पोउपनि संजय पहुरकर, सपोउपनि सुनील टोपकर, पोहवालदार दीपक तायडे, प्रवीण इंगळे, राजेश ठाकूर, मंगेश गीते, मंगेश इंगळे यांनी हत्त्वाची भूमिका बजावली.
अकोल्यातील डाबकी रोड पोलीसांनी जलदगतीने तपास करून अवघ्या काही दिवसांत आरोपीचा शोध घेत गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. या घटनेमुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. आपल्या घरांची सुरक्षितता वाढवण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा City News !