ओरिसा येथे होणा-या तिस-या राष्ट्रीय महिला विद्यार्थी संसदकरिता विद्यापीठाच्या विद्याथ्र्यांची निवड

अमरावती :- ए.आय.यु. नवी दिल्ली आयोजित ओरिसामधील सेनच्युरिअन विद्यापीठ ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड मॅनेजमेंट येथे दि. 01 ते 05 एप्रिल, 2025 दरम्यान होणा-या तृतीय राष्ट्रीय महिला विद्यार्थी संसदकरिता विद्यापीठाच्या विद्याथ्र्यांची निवड करण्यात आली असून निवड झालेल्या चमूंचा प्रशिक्षण वर्ग दि. 24 मार्च रोजी विद्यापीठ परिसरातील स्वामी विवेकानंद विद्यार्थी भवन येथे होणार आहे.
निवड झालेल्या चमूंमध्ये सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी, अमरावतीची कु. श्रावणी रोटे, इन्स्टिट¬ुट ऑफ फार्मसी अॅन्ड रिसर्च, बडनेराची कु. नफिसा शब्बीर हुसैन, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीची कु. अरिफा शब्बीर हुसैन, राखीव म्हणून आर.ए. कला, श्री भी.क. वाणिज्य व स. राठी विज्ञान महाविद्यालय, वाशिमची कु. राधिका दंडे, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीची कु. पुर्वा मानकर यांचा समावेश असून चमू व्यवस्थापक म्हणून लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथील डॉ. अभिजित अणे, ब्रिाजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथील डॉ. मृणाल महाजन यांची निवड करण्यात आली आहे. प्रशिक्षण वर्गाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी केले आहे.