किरीट सोमय्या तीन महिन्यात चार वेळा अमरावती दौऱ्यावर!

अमरावती :- भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अमरावती महानगरपालिकेवर गंभीर आरोप करत 4,500 बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट जन्मदाखले मिळाल्याचा खळबळजनक आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी तब्बल 468 पानाचे पुरावे पोलिसांना सादर केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांसह जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अमरावतीत अवैध रोहिंग्या नागरिकांना मिळालेल्या बनावट जन्मदाखल्यांच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. किरीट सोमय्या यांनी सादर केलेले 468 पानाचे पुरावे आणि जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अमरावती जिल्ह्यात पाच ठिकाणी नायब तहसीलदारांकडून झालेल्या सुनावणीचे आदेश बेकायदेशीर असल्याचेही त्यांनी सांगितले. “साडे चार हजार बोगस जन्मदाखले तात्काळ रद्द करा आणि दोषींवर गुन्हे दाखल करा,” अशी मागणी त्यांनी केली आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Siti News सोबत राहा, पुढील अपडेट्ससाठी!