AmravatiLatest News
मनपा उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी केली प्रभाग क्र.९ वडाळी येथील उद्यान, तलाव व प्रभागातील साफ सफाई कामाची पाहणी
अमरावती :- पुर्व झोन क्रमांक ३ दस्तुरनगर अंतर्गत प्रभाग क्र.९ वडाळी येथील उद्यान, तलाव व प्रभागातील साफ सफाई बाबत मनपा उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी पाहणी केली. सदर परीसरात पाहणी करुन साफ सफाई संदर्भात आवश्यक सूचना देऊन साफ सफाई कामाची पाहणी केली. तसेच दैनंदिन साफ सफाईच्या अनुषंगाने प्रभागामध्ये स्प्रे फवारणी, धुवारणी, कंटेनर परिसराची स्वच्छता, रोड साईड, नाली साईड गाजर गवत काढणे, नाल्या साफ सफाई, इतरत्र पडलेल्या कचरा उचलणे इत्यादी कामे करून घेण्याचे निर्देशही उपायुक्त महोदयांनी दिल्या.
या पाहणी दरम्यान सहाय्यक आयुक्त दिपीका गायकवाड, स्वास्थ अधिक्षक श्रीकांत डवरे, जेष्ठ स्वास्थ निरीक्षक कुंदन हडाले, स्वास्थ निरीक्षक, सफाई कामगार, बिटप्यून उपस्थित होते.