मोबाईल मधील अश्लील व्हिडिओ आणि फोटो दाखवून ४० वर्षीय नराधमाचा १० वर्षीय मुलीवर अत्याचार, तर दुसरीकडे…

भिवंडी : एकीकडे महिला दिनाच्या कार्यक्रमाची रेलचेल सुरू असतानाच दुसरीकडे मात्र अल्पवीयन मुली व महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला असून, १० वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर ४० वर्षीय नराधमाने लैगिंक अत्याचार केला. तर, २४ वर्षीय तरुणीवर २६ वर्षीय तरुणाने प्रेमाचं नाटक करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर आणि भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अत्याचारासह पोक्सोच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून दोन्ही नराधमांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या घटनेतील ४० वर्षीय आरोपी आणि १० वर्षीय पीडित मुलगी भिवंडी शहरात राहतात. त्यामुळे पीडित मुलीचे आईवडील व पीडित मुलगी नराधमाला ओळख होती. त्यातच ६ मार्च रोजी पीडित मुलीच्या आईला तिच्या बहिणीला कळवा येथे सोडून यायचे होते. त्यामुळं नराधमाला मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी घरी बोलावले होते. याचाच फायदा घेऊन ४० वर्षीय नराधामाने त्याच रात्री घरात झोपण्याच्या बहाण्याने पीडित मुलीला मोबाईल मधील अश्लील व्हिडिओ आणि फोटो दाखवून तिच्यावर लैगिंक अत्याचार केला.
दरम्यान पीडित मुलीची आई पहाटे उशीरा घरी आल्यनंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर ३२ वर्षीय पीडितेच्या आईने शांतीनगर पोलीस ठाणे गाठून मुलीवर घडलेला प्रसंग कथन करताच पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोचे कलम ८ १२ नुसार ४० वर्षीय नराधमावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीसांनी दिली. या घटनेतील आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहितीही त्यांनी दिली
दुसऱ्या घटनेतील २६ वर्षीय प्रियकराने २४ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी प्रियकराच्या विरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय पीडित तरुणी आणि २६ वर्षीय आरोपी तरुण हे दोघेही भिवंडी शहारत राहत असून दोघात मैत्री होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात करून, आरोपी तरुणानं प्रेमाचं नाटक करत पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर फिरण्याच्या बहाण्याने पीडित तरुणीवर २४ फेब्रुवारी ते ६ मार्च या कालावधीत भिवंडी तालुक्यातील महापोली,वज्रेश्वरी, कल्याण बायपास, अजमेर आदि वेगवेगळ्या ठिकाणच्या लॉजवर नेवून तीच्यावर अत्याचार केला.
दरम्यान पीडित तरुणीने लग्नाचा तगादा लावला असता त्याने पीडितेला लग्नास नकार दिला. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने ६ मार्च रोजी भिवंडी शहर पोलिस ठाणे गाठून तिच्यावर घडलेल्या प्रसंगाचे कथन करताच पोलिसांनी दगाबाज प्रियकराच्या विरोधात भान्यासं च्या कलम ६४(१) न्वये गुन्हा दाखल केला असून, चौकशी अंती सदर गुन्हा भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.