कारचा कंटेनरला जोरदार धक्का; दोन महिलांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

सातारा :- पाचवड येथे रस्त्यावर बिघाड झाल्याने बंद अवस्थेत उभ्या असणाऱ्या कंटेनरला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कारने जोरदार धडक दिली. यामुळे झालेल्या भीषण अपघातात कार मधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील पाचवड येथे सदरचा भीषण अपघात सकाळी घडला आहे. पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड गावच्या हद्दीत ट्रकमध्ये बिघाड झाल्याने रस्त्यावर बंद स्थितीत ट्रक उभा होता. याच साईडने साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या भरधाव कारने मागून जोरदार धडक दिली. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारवर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नात थेट कंटेनरला धडकली.
दोघांचा जागीच मृत्यू
कारने जोरदार धडक दिल्यामुळे चालकाच्या साइड्ची बाजूचा चक्काचूर झाला आहे. या अपघातामुळे कारमधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात सलमा मोमीन आणि महिदा शेख अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे असून या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी दोघांना कारमधून बाहेर काढत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांचे घटनास्थळी मदतकार्य
सदर अपघाताची माहिती मिळताच भुईंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी अपघातातील जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. तर दोन्ही मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलविले आहेत आहेत. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.