मुंबई : पाण्याची टाकी साफ करताना ५ कर्मचाऱ्यांचा गुदमरुन मृत्यू
मुंबई :- मुंबईत अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुंबईतील नागपाडा परिसरात ५ स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी, ९ रोजी दुपारी जवळपास साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पाण्याची टाकी साफ करताना कर्मचाऱ्यांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बांधकामाधीन इमारतीच्या (खासगी) पाण्याच्या टाकीची ५ कामगार (खासगी कंत्राटी कामगार) साफसफाई करत होते. त्यावेळी गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला. त्यांना तात्काळ जे.जे रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्या पाचही कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाल्याचं सांगितलं. जे.जे रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांकडून ही माहिती देण्यात आली आहे .मिंट रोड, नागपाडा या ठिकाणी कामगारांच्या मृत्यूची ही दुर्दैवी घटना घडली. मृत ५ कामगारांची नावं आणि इतर तपशीलवार माहिती अद्याप मिळालेली नाही.