ईडीफाय शाळेत मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा!

अमरावती :- आजचा दिवस महिलांसाठी अत्यंत खास आहे, कारण संपूर्ण जगभरात 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. अमरावतीतील ईडीफाय शाळेतही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन महिलांच्या सन्मानार्थ विविध उपक्रम राबवले. चला पाहूया, या विशेष सोहळ्याचा संपूर्ण आढावा!
ईडीफाय शाळेत जागतिक महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शाळेतील महिला शिक्षिकांनी ‘बाईपण देगा देवा’ या गाण्यावर नृत्य सादर करून उत्सवाचा आनंद घेतला. विशेष म्हणजे, शिक्षकांनी शिक्षिकांचे फुलांनी व पुष्पवृष्टीद्वारे स्वागत केले. संपूर्ण शाळा रोषणाईने उजळली होती. याशिवाय, इमारतीवरून पुष्पवृष्टी करत महिलांचा सन्मान करण्यात आला. शाळेच्या भिंतींवर शिक्षिकांचे फोटोसह शुभेच्छा बॅनर लावण्यात आले होते, जिथे प्रत्येकाने सही करून आपली भावना व्यक्त केली. या प्रसंगी प्राचार्य जेकब दास यांनी महिला शिक्षिकांना शुभेच्छा देत त्यांच्या योगदानाचा गौरव केला.
महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारा आणि शिक्षिकांच्या सन्मानाचा अनोखा सोहळा ईडीफाय शाळेत पाहायला मिळाला. महिला शिक्षिकांनी हा दिवस आनंदाने साजरा केला, तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यांना विशेष मान दिला. City News कडून सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!