अकोल्यात गुटखा माफियांवर पोलिसांचा धडक छापा!

अकोला :- अकोल्यात गुटखा माफियांवर पोलिसांचा धडक छापा! 9 लाख 42 हजारांचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला आहे. रामदासपेठ पोलीस आणि एसडीपीओ पथकाच्या संयुक्त कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली. संपूर्ण प्रकरण काय आहे,
पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये :
गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी सतिश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, रामदासपेठ पोलिसांनी चारजीन कंपाउंड, दगडीपूल चौक परिसरातील एका टीनच्या गोडाऊनवर छापा टाकला. या छाप्यात नितीन लालचंद अग्रवाल आणि विवेक रामसागर तिवारी या दोघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी 9 लाख 42 हजार 588 रुपये किमतीचा गुटखा आणि तंबाखू जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोला पोलिसांच्या या मोठ्या कारवाईमुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत. प्रतिबंधित पदार्थांचा साठा करून जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. भविष्यातही अशीच धडक मोहीम राबवण्यात येणार आहे का? याकडे सगळ्यांचे लक्ष राहील. पुढील अपडेटसाठी पाहात राहा city news