अश्लील कृत्य करणारा विकृत इसम पोलिसांच्या ताब्यात

नागपूर :- नागपूर शहरात एका हॉटेल मॅनेजरचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा इसम महिलांचे अश्लील व्हिडीओ तयार करत होता. सोशल मीडियावर त्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी वेळीच कारवाई करत त्याला अटक केली आहे. धंतोली पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे.
पाहूया सविस्तर रिपोर्ट..
कर्नाटकचा रहिवासी श्याम कुमार हा नागपूरमधील एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत होता. त्याने महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर त्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर धंतोली पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला अटक केली. बजाज नगर आणि धंतोली पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत हा आरोपी सापडला. पोलिसांनी तपास सुरू केला असून, इतर महिलांचे व्हिडीओ तर काढले नाहीत ना, याचा शोध घेतला जात आहे. नागपूर झोन २ चे डीसीपी राहुल मदने यांनी याबाबत माहिती दिली आहे.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. नागपूर पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे हा विकृत इसम पोलिसांच्या ताब्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, असे आणखी काही प्रकरणे समोर येतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील अपडेटसाठी पाहत राहा city news.