गिट्टीखदान पोलिसांची मोठी कारवाई – दुचाकी चोरटा जेरबंद!

नागपूर :- नागपूर शहरात दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गिट्टीखदान पोलिसांनी मोठी कारवाई करत दुचाकी चोरट्याला ताब्यात घेतले आहे. शिवाजी स्टेडियम परिसरातून चोरी गेलेली दुचाकी आणि आणखी दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, यासंदर्भात आपल्याला अधिक माहिती देऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये!
८ मार्च २०२४ रोजी नागपूरच्या शिवाजी स्टेडियम येथून एका इसमाची दुचाकी चोरीला गेली होती. या घटनेनंतर गिट्टीखदान पोलिसांनी चोरट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस कर्मचारी अजय यादव यांनी गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा सुगावा लावला आणि त्याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ७५ हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या आरोपीचे नाव प्रवेश कन्हैयालाल कंगाले असून तो मानेवाडा येथे राहतो. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
गिट्टीखदान पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील दुचाकी चोरीच्या घटनांवर काही प्रमाणात लगाम बसण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि आपल्या वाहनांची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील अद्ययावत माहितीसाठी पाहत राहा City News!