वाठोडा शुक्लेश्वर ते धामोरी मार्गावर भीषण आग

अमरावती :- अमरावती जिल्ह्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. शेताच्या बांधाला लागलेल्या या आगीमुळे गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. ही आग अज्ञात व्यक्तीने लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अधिक माहितीसाठी पाहूया आमचा विशेष रिपोर्ट :
वाठोडा शुक्लेश्वर ते धामोरी मार्गावर १० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता शेताच्या बांधाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने ही माहिती प्रशासनाला दिली. त्वरित अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेमुळे गावकरी भयभीत झाले असून, ही आग अज्ञात व्यक्तीने लावल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. गावकऱ्यांनी दोषींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वाठोडा शुक्लेश्वर येथे तीन दिवसांत दुसऱ्यांदा आग लागल्यामुळे गावकरी चिंतेत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अशा घटना घडत राहिल्यास संपूर्ण गावासाठी धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. पुढील अपडेटसाठी पाहत राहा CITY NEWS