आता या पुढे एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ नये, शेतकऱ्यांना आयुष्यभर निशुल्क रुग्णसेवा देणार: रविराज देशमुख
तिवसा :- तिवसा तालुक्यातील डिगरगव्हाण येथे नुकताच संत श्री दामोदर महाराज यांचा ८२ वा प्रगटदिन महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त दिनांक ०८ मार्च :२०२५ रोजी भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हिम्मत फाऊंडेशनच्या वतीने भव्य निशुल्क महाआरोग्य व रोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आले. आता या पुढे एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ नये, शेतकऱ्यांना आयुष्यभर निशुल्क रुग्णसेवा मिळावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. निरोगी असणे ही आपल्यासाठी सर्वात मोठी भेट आहे. आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आणि सर्वोत्तम नाते आहे. हा उद्देश कायम ठेवून या शिबिराचे आयोजन भव्य स्वरूपात करण्यात आले होते. ज्यामध्ये मेडिसिन, स्त्रीरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, बालरोग, दंतरोग, न्यूरोलॉजी, शल्यचिकित्सक, नाक-कान-घसा, मेंदू शस्त्रक्रिया (न्यूरो सर्जन), किडनी रोग तज्ञ, हृदय रोग चिकित्सक अशा विविध रोगावरील तब्बल ७० तज्ञ डॉक्टरांची टीम या शिबिरामध्ये सहभागी होती. शिबिराची विशेष वैशिष्ट्ये म्हणजे रक्तदाब व मधुमेह तपासणी आणि शिबीर स्थळावर उपलब्ध औषधेच मोफत वितरण यावेळी करण्यात आले. तसेच शिबीर स्थळावरून रुग्णालयात जाण्याकरिता वाहनांची सुद्धा मोफत सुविधा देण्यात आली होती. रक्तदान शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान सुद्धा केले. तिवसा मतदार संघातील तसेच आजूबाजूच्या अनेक गावातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला असून हजारो रुग्णांची तपासणी या शिबिरात करण्यात आली असून रुग्णांना शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर येथे रवाना सुद्धा करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ज्या रुग्णांना अधिक तपासण्या करणे आवश्यक असल्यास त्या सर्व तपासण्या सुद्धा चांगल्या हॉस्पिटल मध्ये करण्याची जबाबदारी रविराज देशमुख मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात आली आहे.
सदर निशुल्क महाआरोग्य रोगनिदान व रक्तदान शिबिराला यावेळी यावेळी सचिन इंगळे (पश्चिम विदर्भ प्रमुख ओबीसी मोर्चा), श्यामभाऊ नारखेडकर, उमेशभाऊ श्रीखंडे, दीपक वाडीभस्मे, विजय महाराज, तसेच श्री संत दामोदर महाराज संस्थान चे सर्व विश्वस्त तसेच स्व. शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर येथील सर्व डॉक्टर व भाविक भक्त आदींची उपस्थिती होती.
आता या पुढे एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ नये, शेतकऱ्यांना आयुष्यभर निशुल्क रुग्णसेवा देणार: रविराज देशमुख
श्री संत दामोदर महाराज हे एक शेतकरी होती, अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांप्रती त्यांना आदर होता. त्यामुळे त्यांच्या ८२ व्य प्रगटदिनानिमित्य भव्य निशुल्क महाआरोग्य व रोगनिदान व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून शेतकऱ्यांना आयुष्यभर निशुल्क रुग्णसेवा देण्याचा आमचा संकल्प आहे. आणि आता यापुढे एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ नये, यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू, व शेतकऱ्यांच्या आयुष्यातील दुःख दूर करू, असा विश्वास यावेळी रविराज देशमुख यांनी व्यक्त केला.