अंजनगाव बारी-बडनेरा टी पॉईंट येथे ट्रक-दुचाकी अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू!

अमरावती :- सध्या आपल्या समोर एक अत्यंत धक्कादायक बातमी! अंजनगाव बारी-बडनेरा टी पॉईंट येथे ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना नेमकी कशी घडली,
पाहूया सविस्तर रिपोर्ट :
मंगळवारी सकाळी अंजनगाव बारी-बडनेरा टी पॉईंट येथे भीषण अपघात घडला. सय्यद अरमान सय्यद इमरान (वय 36, रा. गवळीपुरा, नवी वस्ती, बडनेरा) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ट्रक क्रमांक MH 27 BX 8879 हा गॅरेजमध्ये जात असताना सय्यद अरमान यांच्या MH 27 AX 8838 क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार ट्रकच्या मागील चाकात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. मृतकाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीएनएस कलम 281 आणि 106(1) अंतर्गत पोलीस तपास सुरू आहे.
तर ही होती अंजनगाव बारी-बडनेरा टी पॉईंट येथील दुर्दैवी घटना. ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अशा अपघातांना जबाबदार कोण? वाहतूक नियमांचे पालन न केल्याने निष्पाप लोकांचे प्राण जात आहेत. हा विषय अत्यंत गंभीर आहे. पुढील तपासात आणखी काय उघड होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पुढील अपडेटसाठी City News सोबत राहा.