मुंबई-नागपूर बदली घोटाळा: महिलेची ३ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

नागपूर :- बदलीच्या आमिषाने फसवणूक! नागपूर शहरात एका महिलेची तीन लाखांची फसवणूक झाली आहे. मुंबईत नोकरी करणाऱ्या महिलेला नागपूर बदलीसाठी पैसे देण्यास भाग पाडण्यात आले. मात्र, पैसे घेतल्यावरही बदली न झाल्याने सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकार नेमका काय आहे
पाहूया सविस्तर रिपोर्ट..
मुंबईत नोकरी करणाऱ्या एका महिलेसाठी नागपूर बदली एक स्वप्न होतं. मात्र, हे स्वप्न तिच्यासाठी मोठा धक्का ठरलं. एका महिलेने तिला नागपूर बदलीसाठी ३ लाख रुपये घेतले, स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं, पण प्रत्यक्षात काहीच केलं नाही. अखेर फसवणुकीचा पर्दाफाश झाला आणि सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. आरोपी महिलेविरुद्ध ४२० आणि ४०६ कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.
नोकरीसाठी बदलीसारख्या प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हायला हव्यात, मात्र अशा घटनांमुळे फसवणुकीचे नवे प्रकार समोर येत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू आहे. अशा फसवणुकीपासून सावध राहा आणि कोणालाही पैसे देण्याआधी खात्री करा. पुढील अपडेट्ससाठी राहा सिटी न्यूजसोबत!