गौरखेडा गावातील सिमेंट रस्त्याचे निकृष्ट काम – ग्रामस्थ आक्रमक!

निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधकाम आणि ग्रामस्थांचा संताप! अमरावती जिल्ह्यातील गौरखेडा गावात अवघ्या दोन महिन्यांतच नवीन सिमेंट रस्ता खराब झाल्याने स्थानिक संतप्त झाले आहेत. तब्बल वीस लाख रुपये खर्च करूनही, रस्त्याची ही अवस्था नेमकी का? कोण जबाबदार?
पाहूया हा सविस्तर रिपोर्ट
गौरखेडा गावातील सिमेंट रस्ता अवघ्या दोन महिन्यातच खराब झाला आहे. रस्त्यावरून गाड्या जाण्यास कठीण झाले असून, संपूर्ण गिट्टी बाहेर आलेली दिसत आहे. ग्रामस्थांनी ठेकेदार आणि ग्रामपंचायत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट आहे. या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
ग्रामपंचायतीने याकडे कोणतीही दखल घेतलेली नाही, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. रस्ता पुन्हा मजबूत करून द्यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
गौरखेडा गावातील रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वीस लाखांचा निधी खर्च करूनही फक्त दोन महिन्यांतच रस्त्याची अशी अवस्था का? या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का? आणि दोषींवर कारवाई केली जाणार का? हा प्रश्न गावकऱ्यांसमोर आहे. पुढील अपडेट्ससाठी पाहत राहा City News!