धुलीवंदन दिवशी शहरातील सर्व उड्डाण पूल राहणार बंद!

अमरावती :- धुलीवंदनाचा सण आनंदाने साजरा करण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 14 मार्च रोजी शहरातील प्रमुख उड्डाण पूल सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. कोणते पूल बंद राहणार आहेत आणि पोलिसांनी काय आदेश दिले आहेत.
पाहूया ह्या सविस्तर रिपोर्टमध्ये..
धुलीवंदन हा रंगांचा आणि आनंदाचा सण असला तरी, मद्यप्राशन करून वाहन चालविल्यामुळे अपघात होण्याच्या घटना घडतात. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहर वाहतूक पोलीस विभागाने 14 मार्च रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत प्रमुख उड्डाण पूल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडगे नगर ते जिल्हा स्टेडियम, इर्विन चौक ते राजापेठ पोलीस स्टेशन आणि कुथे हॉस्पिटल ते नंदा मार्केट या तीन उड्डाण पूलांवर वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे.
शहर पोलीस उपायुक्त मुख्यालयाच्या वतीने अधिसूचना जारी करण्यात आली असून, नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
तर धुलीवंदनाच्या उत्साहात सुरक्षिततेला प्राधान्य द्या! प्रशासनाने घेतलेला हा निर्णय तुमच्या सुरक्षेसाठी आहे. नियमांचे पालन करा आणि रंगांचा सण आनंदाने साजरा करा! अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी पाहत राहा City News.