नग्न अवस्थेत मृतदेह! लोखंडी सळईने चटके देत 28 वर्षीय तरुणाची क्रूर हत्या

सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.नग्न अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे.हत्येपूर्वी पीडितावर अत्याचार आणि छळ करण्यात आल्याचे समोर येत आहे.काय आहे या क्रूर हत्येचा संपूर्ण तपशील? कोण आहे हत्येचा सूत्रधार?
पाहूया आमचा स्पेशल रिपोर्ट
माळशिरस-पिलीव रोडच्या पिलीव हद्दीतील एका निर्जन ठिकाणी, वन विभागाच्या परिसरात, नग्न अवस्थेत 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. हत्येपूर्वी त्याच्या शरीरावर लोखंडी सळईने चटके देण्यात आले, त्याला निर्दयपणे मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. हे दृश्य पाहून स्थानिक अवाक् झाले आणि तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.
मृत तरुणाचे नाव आकाश अंकुश खुर्द पाटील (वय-28) असून, तो एका नामांकित कुटुंबातील होता. कुटुंबीयांचा आक्रोश मोठा आहे. त्यांच्या मते, आकाशच्या मृत्यूनंतर अनेक गोष्टी संशयास्पद दिसत आहेत आणि पोलिसांनी तातडीने हत्येचा छडा लावावा.
पोलिसांना घटनेच्या ठिकाणी मृतदेहाजवळच दुचाकी आढळली आहे. त्यामुळे ही हत्या नेमकी कुठे झाली आणि मृतदेह इथे आणला गेला का, याचा तपास सुरू आहे. अनैतिक संबंध किंवा प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल लोकेशन आणि कॉल रेकॉर्ड्स तपासत आहेत. आरोपी लवकरच हाती लागतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ही हत्या नेमकी कोणी केली? तिच्यामागचे कारण काय आहे? आणि कोणत्या धक्कादायक सत्याचा खुलासा होणार आहे? हे जाणून घेण्यासाठी सिटी न्यूज ला फॉलो करा आणि पुढील अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा.