अकोला-अमरावती महामार्गावरील कुरुमजवळ नायरा पेट्रोल पंपासमोर अपघात.

अकोला-अमरावती महामार्गावरील कुरुमजवळ नायरा पेट्रोल पंपासमोर अपघात.
उभ्या ट्रॅक्टरला भरधाव कारची जोरदार धडक.
अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी.
मृतांमध्ये जळगाव येथील अल्पना पराग लिमये व सुनील ठाकरे यांचा समावेश.
अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली
“मूर्तिजापूर जवळ भीषण अपघात! भरधाव कारने उभ्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी. महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या दुर्घटनेबाबत सविस्तर माहिती घेऊया…”
“अकोला-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील कुरुम येथे भीषण अपघात झाला आहे. नायरा पेट्रोल पंपासमोर उभ्या ट्रॅक्टरला भरधाव कारने जबर धडक दिली. या दुर्घटनेत जळगाव येथील अल्पना पराग लिमये आणि सुनील ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.”
“हा अपघात नेमका कशामुळे झाला? वाहनचालकाचा निष्काळजीपणा की अन्य कोणते कारण? याचा तपास पोलिस करत आहेत. या अपघातानंतर महामार्गावर सुरक्षेच्या उपाययोजनांबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत.