मूर्तिजापूर शहरात ४५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला, शहरात खळबळ!

मूर्तिजापूर :- मूर्तिजापूर शहरात आज सकाळी रेल्वे स्टेशन परिसरात एका ४५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर इसमाचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
या घटनेची सविस्तर माहिती घेऊया :
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात उष्णतेची लाट वाढत चालली असून, प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. मात्र, याच दरम्यान, स्टेशन परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. या व्यक्तीचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, सदर इसम गणेश नगर भागात राहत होता आणि शेतकरी केंद्र येथे काम करत होता. घटनेची माहिती मिळताच संत गजानन महाराज आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात हलवला. याप्रकरणी पुढील तपास मूर्तिजापूर पोलीस करत आहेत.
या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, उष्णतेच्या झळा दिवसेंदिवस वाढत असल्याने खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. या प्रकरणावर अधिक अपडेट्ससाठी पाहत राहा City News.