अकोला रेल्वे स्थानकाजवळ प्राणघातक हल्ला!

अकोला :- अकोला रेल्वे स्थानक परिसरात दिवसाढवळ्या चोरट्याचा थरार पाहायला मिळाला. एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरटा पळाला, मात्र पतीने त्याचा पाठलाग केल्याने चोरट्याने त्याच्यावरच हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पाहूया संपूर्ण बातमी :
अकोला रेल्वे स्थानक परिसरात एका हॉटेलसमोर ही घटना घडली. हेमंत गावंडे यांनी पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून पळणाऱ्या चोरट्याचा पाठलाग केला. मात्र, चोरट्याने थेट हेमंत गावंडे यांच्यावरच दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर स्थानक परिसरात भीतीचे वातावरण आहे. रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षा व्यवस्थेचा अभाव आणि वाढती गुन्हेगारी ही मोठी समस्या बनत आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून, पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. पुढील अपडेटसाठी पाहत राहा City News