अकोल्यात पोपटांची बेकायदा विक्री; वनविभागाची धडक कारवाई

अकोल्यात : अकोल्यात बेकायदा पोपट विक्री प्रकरणात वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. गुरांच्या बाजारात सुरू असलेल्या पक्षी विक्रीवर छापा टाकत सहा पोपटांची सुटका करण्यात आली आहे.
पाहुयात हा संपूर्ण रिपोर्ट :
अकोल्यातील गुरांच्या बाजारात बेकायदेशीररीत्या पोपटांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या पथकाने धडक कारवाई केली. विक्रेत्यांना विक्री थांबवण्याचा इशारा देण्यात आला असून, जप्त करण्यात आलेले सहा पोपट लवकरच नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहेत.
वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत पक्ष्यांची विक्री बेकायदेशीर आहे. नागरिकांनी अशी विक्री दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तर, अकोल्यातील या घटनेनंतर वनविभागाने दिलेला इशारा नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे. वन्यजीवांचे संरक्षण ही आपली जबाबदारी आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा city news