अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्रामची सर्व महाविद्यालयांनी अंमलबजावणी करावी – कुलगुरूविद्यापीठात प्राचार्यांसाठी कार्यशाळा संपन्न
अमरावती :- इंटर्नशिपचा फायदा सर्व विद्याथ्र्यांना व्हायला पाहीजे, त्यादृष्टिने अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्रामची अंमलबजावणी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयाने करावी. जास्तीत जास्त विद्याथ्र्यांना या सुविधेचा लाभ होण्यासाठी सर्व प्राचार्यांनी याचा प्रचार करुन विद्याथ्र्यांपर्यंत ही माहिती पोहचावी, असे आवाहनात्मक प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी अध्यक्षीय भाषण करतांना केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य मंडळ विभागाच्यावतीने अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम विषयावर प्राचार्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख अधिसभा सभागृहात करण्यात आले, त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषण करतांना कुलगुरू बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, प्रमुख वक्ते म्हणून ब्रिाजलाल बियाणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिपक धोटे व विद्यापीठ सल्लागार परिषद सदस्य डॉ. अनंत मराठे, ननसा संचालक डॉ. अजय लाड व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यशाळेचे उद्घाटन झाल्याची घोषणा कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केली. अध्यक्षीय भाषणात ते पुढे म्हणाले, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची विद्यापीठाने अंमलबजावणी केली आहे. नवीन अभ्यासक्रमामध्ये पाठांतराऐवजी प्रॅक्टीकलवर अधिक भर दिलेला आहे. उद्योगाला हवे असलेले कौशल्याधारित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी इंटर्नशिप महत्वाची आहे. विद्याथ्र्यांना इंटर्नशिपची सुविधा मिळावी, याकरिता ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. सर्व प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयातील विद्याथ्र्यांना इंटर्नशिपचा लाभ सर्व विद्याथ्र्यांना द्यावयाचा असून भविष्यातील नोकरीसाठी विद्याथ्र्यांचे क्रेडीट वाढविणारा आहे.
इंटर्नशालाच्या माध्यमातून इंटर्नशीप सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहे. बियाणी महाविद्यालयातील 465 विद्याथ्र्यांना त्यामाध्यमातून इंटर्नशीपची सुविधा मिळालेली आहे. सर्व प्राचार्यांना डॉ. दिपक धोटे व डॉ. अनंत मराठे या तज्ज्ञ वक्त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ या कार्यशाळेच्या माध्यमातून निश्चितच होईल, असे सांगून सर्व प्राचार्यांनी आपल्या विद्याथ्र्यांपर्यंत ही माहिती पोहचावी असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
पहिल्या सत्रात विद्यापीठ अनुदान आयोगाची अप्रेंटिसशीप एम्बेडेड डिग्री प्रोग्रामबाबत असलेली मार्गदर्शन तत्वे त्यानुसार विद्यापीठ व महाविद्यालयांची भूमिका या विषयावर प्राचार्य डॉ. दिपक धोटे यांनी तर ए.ई.डी.पी. कोणासाठी, का आणि कसा या विषयावर डॉ. अनंत मराठे यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. प्रास्ताविक भाषणातून प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी ए.ई.डी.पी. वर सखोल माहिती देऊन कार्यशाळा आयोजनामागील भूमिका विषद केली. विद्याथ्र्यांना मोठ¬ा प्रमाणावर या योजनेचा लाभ द्यावा असेही ते म्हणाले.
प्रबोधनसूर्य संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी कुलगुरूंच्या हस्ते शाल व स्मृतिचिन्ह देवून प्राचार्य डॉ. दिपक धोटे व डॉ. अनंत मराठे यांचा सत्कार केला. संचालन डॉ. अभिजीत इंगळे यांनी तर आभार संचालक डॉ. अजय लाड यांनी मानले. कार्यशाळेला प्राचार्य मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.