नवी मुंबईत पोलिस ठाण्यातून आरोपी फरार

नवी मुंबई :- नवी मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांसमोरच पोलिस ठाण्यातून आरोप पळाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यक्षमेतवर प्रश्निन्ह उपस्थित झाले आहे. देह विक्री व्यवसायासाठी महिला पुरवल्या प्रकरणी या आरोपीला अटक करण्यात आली होती. पोलिस या फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने नेरुळ मधील सत्यम हॉटेल वर छापा टाकत पाच महिलांची सुटका केली होती. सदर कारवाई नंतर गुन्हा दाखल करण्यासाठी वैश्या व्यवसायासाठी महिला पुरवणाऱ्या आरोपीला घेऊन नेरुळ पोलीस ठाण्यात आले असता. आरोपी साहिल उर्फ शाहीन मंडल याने थेट नेरुळ पोलीस ठाण्यातूनच पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलीस ठाण्यातूनच पोलिसांच्या नजरेसमोरून आरोपी फरार झाल्याने नेरुळ पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे कामात निष्काळजीपणा करणाऱ्या नेरुळ पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर पोलीस आयुक्त काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल
पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 12 मार्च रोजी पनवेल मधील पळस्पे येथील मॅरेथॉन नेक्सन औरा इमारतीच्या 29 व्या मजल्यावरून आठ वर्षीय मुलीला बेडरूच्या खिडकीतून खाली फेकून आई मैथिली दुआ हिने स्वतः देखील उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी आता पतीचे अन्य स्त्री सोबत विवाहबाह्य संबंध असल्याने पत्नीला मारहाण करुन त्याने तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी सासूने आशिष दुवा या जावया विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पनवेल शहर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपी आशिष दुवा याला अटक केली आहे.