Crime NewsLatest NewsNagpur
नागपूरच्या शिवाजी पुतळा परिसरातून रूट मार्च; अतिरिक्त पोलीस आयुक्तांचा संदेश!

नागपूर :- नागपूर शहरातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पुतळा परिसरात पोलिसांनी शांतता आणि सुरक्षेचा संदेश देण्यासाठी रूट मार्च काढला. अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवाजी राठोड यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च आयोजित करण्यात आला. या रूट मार्चमध्ये स्थानिक पोलीस, राज्य राखीव पोलीस दल (SRPF) आणि दंगा नियंत्रण पथक सहभागी झाले होते. नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि कायद्याची अंमलबजावणी सुनिश्चित करणे हा यामागील प्रमुख उद्देश होता.
पाहुयात सविस्तर रिपोर्ट :
नागपूर पोलिसांनी नागरिकांना कायद्याचं पालन करण्याचं आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. शहरात सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, कोणत्याही प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे. पुढील अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा.