Crime NewsLatest NewsNagpur
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अल्पवयीन मुलीची फसवणूक

नागपुर :- नागपुर शहरातील गिट्टीखदानमध्ये एका अल्पवयीन मुलीची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आरोपीने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर अत्याचार केले आहेत. गिट्टीखदान पोलीस स्टेशन मधे अल्पवयीन मुलीने तिच्या आईसोबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीशी आधी मैत्री केली आणि नंतर प्रेमसंबंध प्रस्थापित केले. लग्नाचे खोटे आश्वासन देऊन आरोपीने मुलीसोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा मुलीने लग्नाबद्दल विचारले, तेव्हा आरोपीने तिच्याशी संबंध तोडले आणि तो फरार झाला. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
नागपुर पोलिसांनी मुलींना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारचा कोणी फसवण्याचा प्रयत्न करत असल्यास, तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.