अमरावती विमानतळ सुरू होणार! 30 मार्चला ट्रायल फ्लाइट आणि 20 एप्रिलपासून नियमित सेवा!

अमरावती :- अमरावतीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर अमरावती विमानतळाचे स्वप्न साकार होणार आहे. 30 मार्च 2025 रोजी Alliance Air विमानाची ट्रायल फ्लाइट होणार असून 20 एप्रिलपासून नियमित सेवा सुरू होणार आहे. चला, या संदर्भातील सविस्तर माहिती पाहूया.
अमरावतीकरांचे स्वप्न अखेर साकार होणार आहे. अमरावती विमानतळ आता प्रत्यक्षात सुरू होणार असून या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आमदार रवि राणा यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड (MADC) च्या MD स्वाती पांडे यांची भेट घेतली आणि विमानतळाच्या उद्घाटन आणि नियमित सेवा सुरू करण्यावर चर्चा केली.
30 मार्च 2025 रोजी 72-सीटर Alliance Air विमानाची ट्रायल फ्लाइट होणार आहे. ही चाचणी यशस्वी ठरल्यास लवकरच विमानतळ सुरू होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
20 एप्रिल 2025 पासून Alliance Air ची नियमित सेवा सुरू होणार आहे. सध्या सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी फ्लाइट्स चालणार आहेत. यामुळे अमरावतीकरांना मुंबई, पुणे, दिल्ली अशा मोठ्या शहरांशी थेट कनेक्शन मिळणार आहे. प्रवासाचा वेळ वाचणार असून व्यवसायिक, विद्यार्थी आणि पर्यटकांना मोठा फायदा होईल.
MADC ने विमानतळाच्या सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा केल्या आहेत. रनवे, एटीसी टॉवर, सुरक्षा व्यवस्थापन यासह सर्व सुविधा आता कार्यान्वित आहेत. विमानतळाच्या उद्घाटनानंतर अमरावतीच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला मोठी चालना मिळेल. विमानसेवेच्या मदतीने पर्यटन आणि व्यापार वाढण्याची शक्यता आहे. अमरावती विमानतळ लवकरच प्रवाशांसाठी खुले होणार आहे. या ऐतिहासिक क्षणासाठी अमरावतीकर सज्ज आहेत.
तर ही होती अमरावती विमानतळाविषयीची महत्त्वाची माहिती. 30 मार्चला होणारी ट्रायल फ्लाइट आणि 20 एप्रिलपासून सुरू होणारी नियमित सेवा हे अमरावतीच्या प्रगतीसाठी मोठे पाऊल आहे. यासंबंधित कोणत्याही अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूस . धन्यवाद!