उरळ पोलिसांच्या अमानुष मारहाणीविरोधात युवकांचे आंदोलन, माजी महापौर विजय अग्रवालांचा कारवाईची मागणी

अकोला :- मित्रांनो, आज आपल्याला एक धक्कादायक घटना सांगायची आहे. उरळ पोलिसांनी काही युवकांना मोबाइलवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून अमानुषपणे मारहाण केली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर मोठ्या संख्येने युवकांनी आंदोलन केले आणि पोलिस अधीक्षकांना निवेदन दिलं आहे
उरळ पोलिसांच्या अमानुष मारहाणीच्या घटनेने शहरात संताप निर्माण केला आहे. काही युवकांनी मोबाइल फोनवर स्टेटस ठेवले होते, त्यावरून उरळ पोलिसांनी त्यांना अमानुषपणे मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ युवकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन केले आणि पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर केले आहे.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर विजय अग्रवाल यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांची भेट घेतली. त्यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी देखील शेकडो संख्येने पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांना निवेदन दिले असून, दोषी असलेल्या उरळ पोलिसांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पीडित विद्यार्थी म्हणाला आम्हाला फक्त न्याय हवा आहे. पोलिसांनी आम्हाला मारहाण केली, आम्ही केवळ आमच्या विचारांना मांडले होते. आम्हाला आशा आहे की दोषी पोलिसांवर कठोर कारवाई केली जाईल.” हे प्रकरण गंभीर असून, यातून कायदेशीर कारवाई होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. आता यापुढे काय घडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यवकांना न्याय मिळावा अशी सर्वांची इच्छा आहे. पुढील अपडेटसाठी आमच्यासोबत राहा.