शिवशाही बसला लागली भीषण आग | सर्व प्रवासी सुखरूप | शॉर्ट सर्किटचा अंदाज

चोर माऊली :- यवतमाळ-अमरावती मार्गावर धावणाऱ्या शिवशाही बसला अचानक आग! चोर माऊली गावाजवळ लागलेल्या भीषण आगीत बस पूर्णपणे जळून खाक! सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले. काय आहे संपूर्ण प्रकरण? चला जाणून घेऊया.
शनिवारी दुपारी 1:30 वाजता यवतमाळ-अमरावती मार्गावर चोर माऊली गावाजवळ धावणाऱ्या राज्य परिवहन विभागाच्या शिवशाही बसला अचानक आग लागली. प्रवाशांनी मोठ्या घाबरलेल्या अवस्थेत बसमधून उडी मारून जीव वाचवला. प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समोर येत आहे. बसला आग लागल्याचे लक्षात येताच चालक आणि कंडक्टर यांनी तत्काळ प्रवाशांना सावध केले. काही क्षणांतच आग भडकल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली. बडनेरा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत बसचा राख झालेला सांगाडा उरला होता. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र प्रवाशांचे सामान आणि बसचं मोठं नुकसान झालं आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
शिवशाही बसच्या या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही हे नक्कीच दिलासादायक आहे. मात्र, ही घटना पुन्हा एकदा प्रवास सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांची गरज अधोरेखित करते. अशा दुर्घटना टाळण्यासाठी राज्य परिवहन विभागाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.